विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchirli) : तहसिल कार्यालय, मुलचेश ता. मुलचेरा जिल्हा गडचिरोली येथील पुरवठा निरीक्षक राहूल भाउजी डोंगरे (४०) पद-पुरवठा निरीक्षक (वर्ग-३) यांना ५०० रूपयाची लाच स्विकारतांना ॲन्टी करप्शन गडचिरोली पथकाने आज रंगेहात पकडले.
तक्रारदार हे मु. मुखडी टोला पो. गोविंदपुर ता. मुलचेरा जिल्हा गडचिरोली येथील रहीवासी असुन ते शेतीचा व्यवसाय करतात. तक्रारदाराची आई जिवनकला गेडाम हिचे नावे असलेला राशन कॉर्ड मध्ये वडील, मजवा भाऊ, वहीणी व भावाची मुलगी यांची नावे होती. तक्रारदार यांचे मजवा भाऊ गुरुदास यांच्या कुंटुबाचा नविन राशन कॉर्ड वहीनी वर्षा गुरुदास गेडाम यांचे नावे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी तयार करण्यात आले. त्यावर थम मशीनवर नाव न आल्याने राशन मिळत नसल्याचे वहीनी वर्षा यांनी सांगीतले. तक्रारदाराचे वहीणीचे राशन कार्डवर राशन मिळत नसल्याने, महाफुड साईडवर कागदपत्रे अपलोड करण्याकरीता ५०० रू. लाच रक्कमेची मागणी केली. तकारदार यांना लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली कॅम्प मुलचेरा येथील अधिकाऱ्यांना भेटुन तक्रार नोंदविली.
पोलीस उपअधीक्षक, अनामिका मिर्झापुरे, ला.प्र.वि. गडबिरोली यांचे पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक, श्रीधर भोसले यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनियरित्या शहानिशा करून सापळ कारवाईचे आयोजन केले असता, त्यामध्ये पडताळणी दरम्यान तक्रारदाराचे वहीणीचे राशन कार्डवर राशन मिळत नसल्याने, महाफुड साईडवर कागदपत्रे अपलोड करण्याकरीता आरोपी राहूल भाऊजी डोंगरे, पद-पुरवठा निरीक्षक, तहसिल कार्यालय मुलचेरा, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली यांनी ५०० रूपयाची पंच साक्षीदारासमक्ष सुरपट मागणी करून ५०० रू. लाच रक्कम स्विकारतांना रंगेहात मिळून आल्याने त्यांचे विरुध्द पो.स्टे. मुलचेरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी डोंगरे यांचे आष्टी येथील निवासस्थानाची ॲन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोली चम्मु कडुन झडती घेण्यात आली.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर ॲन्टी करप्शन ब्युरो नागपूर, सचिन कदम अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपुर यांचे मार्गदर्शनात व पोलीस उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे यांचे पर्यवेक्षणात पो.नि. श्रीधर भोसले, पोहवा शंकर डांगे, पोना किशोर जौजारकर, पोशि संदिप उडाण, संदिप घोरमोडे, चापोना प्रफुल डोर्लीकर, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांनी केलेली आहे.
