Latest Posts

गडचिरोलीत तेली समाजाची OBC मोर्चासाठी बैठक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आज बुधवार, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता संताजी सभागृह, गडचिरोली येथे एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये १० ऑक्टोबर, शुक्रवार रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य ओबीसी मोर्चाच्या नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

या मोर्चामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील तेली समाजाच्या बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी नियोजन करण्यात आले असून, उपस्थित मान्यवरांनी समाजबांधवांना मोर्चामध्ये सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष प्रमोद शंकरराव पिपरे, प्रांतिकचे विभागीय उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, जिल्हा संघटक रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष विलास पाटील भांडेकर, माजी नगराध्यक्ष सौ. योगिता पिपरे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष राहुल नैताम, प्रा. देवानंद कामडी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. लता कोलते तसेच रमेश बोदलकर, रमेश नैताम, पंकज नैताम, अनिल भांडेकर, अजय भांडेकर, विजय भांडेकर, अरुण नैताम, तुकाराम पिपरे, हरिदास भांडेकर, सदाशिव बारसागडे, पुष्पाताई करकाडे, वंदना बारसागडे व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

या मोर्चामार्फत सकल ओबीसी समाजाच्या खालील प्रमुख मागण्यांचा जोरदार पाठपुरावा करण्यात येणार आहे: –
१. ओबीसी विरोधातील काळा जी.आर. तात्काळ रद्द करा
२. खोटे कुणबी दाखले देणे थांबवा
३. ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा
४. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण व निधी द्या

Latest Posts

Don't Miss