Latest Posts

आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या : परिसरात खळबळ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Balharpur) : स्थानिक  गोकुळनगर वॉर्डातील १४ वर्षीय आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवार, १४ सायंकाळी घडली. मृत विद्यार्थिनीचे नाव वेदिका राजु राजपूत असे असून ती आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आठवीत शिकत होती.

घटनेच्या दिवशी वेदिकाचे वडील बाहेरगावी गेले होते तर आई बाजारात गेली होती. घरात एकटी असताना तिने दुपट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेतला. घरच्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, दुपट्टा सुटल्याने वेदिका खाली कोसळलेली दिसून आली. तिला तत्काळ डॉक्टरांकडे नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

अवघ्या १४ वर्षांच्या मुलीने आत्महत्या का केली? याबाबत परिसरात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. घटनेची माहिती बल्लारपूर पोलिसांनी दिली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून शव विच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले. पोलीसांनी मर्ग दाखल केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे करीत आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Latest Posts

Don't Miss