Latest Posts

दिव्यांग विद्यार्थ्यांना दिव्यांग शिष्यवृत्ती अर्ज आमंत्रित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत शालांतपूर्व शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सन २०२५ – २०२६ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते दहावी इयत्तामध्ये शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपूर्व शिष्यवृत्ती राबविण्यात येते. शालांतपूर्व शिष्यवृत्ती योजना ही जिल्हा दिव्यांग सक्षमिकरण अधिकारी, नागपूर मार्फत राबविण्यात येत आहे.

संबंधित प्राथमिक व माध्यमिक सामान्य शाळेतील तसेच विशेष शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकडील प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांना दिव्यांग शिष्यवृत्ती ऑफलाईन अर्ज भरण्याकरिता सन २०२५ – २०२६ करिता सुरूवात झालेली आहे.

सामान्य व विशेष शाळेतील इयत्ता पहिली ते दहावी इयत्तामध्ये शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाइटवर अर्ज करण्याची कार्यवाही करण्याबाबत कळविण्यत आले होते. परंतु सदर ऑनलाईन प्रणाली विकसित होईपर्यंत अर्ज ऑफलाईन पध्दतीने निकाली काढण्यात येतील असे दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांनी पत्राद्वारे आदेशीत केले आहे.

सन २०२५ – २०२६ करीता नागपूर जिल्हयामध्ये शाळेत प्रवेश घेतलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शालांतपूर्व शिष्यवृत्ती योजनेचे फॉर्म दिव्यांग विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर भरण्याची कार्यवाही करावी. या विषयासंबंधात चौकशी करावयाची असल्यास कार्यालयीन वेळेत जिल्हा परिषद येथे जिल्हा दिव्यांग सक्षमिकरण विभाग, जिल्हा परिषद, नागपूर येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमिकरण अधिकारी अजय अहिवळे यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss