Latest Posts

देसाईगंज नगर परिषदेची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर

– सर्वसामान्य व आरक्षित प्रभाग निश्चित

– नागरिकांना तक्रारीसाठी सात दिवसांचा कालावधी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / देसाईगंज (Desaiganj): नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ११ वाजता प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. उपविभागीय अधिकारी देसाईगंज प्रसेनजित प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत कार्यवाही पार पडली. यावेळी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सतिश चौधरी आणि सहायक प्राधिकृत अधिकारी उपस्थित होते.

सर्व उपस्थित नागरिकांना प्रभागांची संख्या, सदस्य संख्या, आरक्षण प्रकार आणि प्रभागांची व्याप्ती याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. सोडती प्रक्रियेत राजर्षी शाहू महाराज नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेत उपस्थित लहान मुलांच्या हस्ते प्रभागनिहाय चिठ्ठया काढून आरक्षण निश्चित करण्यात आले.

प्रभाग क्रमांक, जागा क्रमांक व आरक्षण –
प्रभाग १: अ)    नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब)     सर्वसाधारण (स्त्री)
प्रभाग २:    अ)    अनुसूचित जमाती,    ब    ) सर्वसाधारण (स्त्री)
प्रभाग ३:    अ)    अनुसूचित जाती (स्त्री), ब    ) सर्वसाधारण
प्रभाग ४: अ)    अनुसूचित जाती,    ब)    सर्वसाधारण (स्त्री)
प्रभाग ५: अ)    नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब)     सर्वसाधारण (स्त्री)
प्रभाग ६ :     अ)    अनुसूचित जाती,    ब)    सर्वसाधारण (स्त्री)
प्रभाग ७ :    अ)    अनुसूचित जाती (स्त्री), ब)    सर्वसाधारण
प्रभाग ८ :    अ)    नागरिकांचा मागास प्रवर्ग,    ब)    सर्वसाधारण (स्त्री)
प्रभाग ९ : अ)    नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री),    ब)    सर्वसाधारण
प्रभाग १० : अ)    नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री), ब)     नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री), क)    सर्वसाधारण

सोडती प्रक्रियेच्या पूर्ण झाल्यानंतर प्रभागनिहाय बिनराखीव जागांचा तपशीलही उपस्थितांना देण्यात आला. आरक्षणाबाबत कोणतीही तक्रार असल्यास, ०९  ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करण्याची माहिती देण्यात आली.

सदर प्रसंगी शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss