– विजयादशमी पासून शताब्दी वर्षाला सुरुवात
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): चंद्रपूर ला यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत आहे. या शताब्दी वर्षाच्या चंद्रपूर महानगराचा विजयादशमी उत्सव रविवार, ०५ अक्टोम्बर २०२५ ला ठीक सायं ०६.३० वाजता. पोलीस फुटबॉल ग्राउंड, तुकूम रोड,चंद्रपूर येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पुरुषोत्तमजी सातपुते, जेष्ठ विधिज्ञ, चंद्रपूर हे उपस्थित असणार आहे.
प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह- प्रचार प्रमुख प्रदीपजी जोशी हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. तरी चंद्रपूर शहरातील सर्व स्वयंसेवकानी, नागरिकांनी, विविध संगटना व संघटना पदाधीकारी यांनी सहपरिवार या जाहीर कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा.नगर संघचालक श्री रवींद्रजी भागवत, चंद्रपूर नगर तर्फे करण्यात येत आहे.
पथसंचलन सर्व स्वयंसेवकांचे पथसंचलन रविवार ०५ अक्टोम्बर २०२५ ला सायंकाळी ठीक ०४.३० वाजता पोलीस फुटबॉल ग्राउंड, तुकूम रोड, चंद्रपूर येथून तुकूम परिसरात मुख्य रस्त्याने निघेल.
