Latest Posts

हायकोर्टांना बॉम्बस्फोटाची धमकी, दिल्ली-मुंबईत खळबळ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली/मुंबई New (mumbai): दिल्ली उच्च न्यायालयाला शुक्रवारी दुपारी ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर काही तासांतच मुंबई उच्च न्यायालयालाही अशीच धमकीची मेल प्राप्त झाली. या प्रकरणामुळे दोन्ही न्यायालय परिसर रिकामे करण्यात आले असून सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

दिल्ली उच्च न्यायालयाला आलेल्या ईमेलमध्ये न्यायाधीशांच्या चेंबरसह आवारात तीन स्फोटके ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. दुपारच्या नमाजानंतर स्फोट होईल, त्यामुळे दुपारी २ वाजेपर्यंत न्यायालय रिकामे करा, असा मजकूर मेलमध्ये होता. माहिती मिळताच पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी तातडीने परिसर रिकामा करून झडतीला सुरुवात केली.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयालाही अशाच आशयाचा ईमेल मिळाला. तत्काळ कारवाई करत संपूर्ण कोर्ट रिकामे करण्यात आले असून तपास सुरू आहे. वकील, न्यायाधीश आणि कर्मचारी यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

धमकीच्या ईमेलमधील पत्ता [kanimozhi.thevidiya@outlook.com] (mailto:kanimozhi.thevidiya@outlook.com) असा असल्याचे पोलिसांनी सांगितले. मेलमध्ये २०१७ पासून पोलिस यंत्रणेत घुसखोरी केल्याचा दावाही करण्यात आला आहे.

यापूर्वीही दिल्लीतील शाळा, महाविद्यालये, मुख्यमंत्री सचिवालय व मौलाना आझाद मेडिकल कॉलेजला अशाच स्वरूपाच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्या सर्व खोट्या ठरल्या होत्या. त्यामुळे ही धमकीदेखील खोटी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असली, तरी दक्षतेचा उपाय म्हणून व्यापक तपास सुरू ठेवण्यात आला आहे.

Latest Posts

Don't Miss