विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur): बहुजन समाज पार्टी शहर बल्लारपूर कार्यकारिणीच्या वतीने ११ एप्रिल २०२६ रोजी संतोषी माता वॉर्ड येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मान-वंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची अध्यक्षता विधानसभा क्षेत्र बल्लारपूर चे अध्यक्ष किशन केशकर यांनी केली.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी असलम शेख तसेच मिलिंद खोबरागडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाला स्थानिक बालक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच बसपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये वीरेंद्र धूसिया (बामसेफ संयोजक), शिवविलास वर्मा BVF संयोजक, विधानसभा क्षेत्र बल्लारपूर, शेख मूसा मलंग, महेश निषाद, वाजिद खान, मौसिम शेख, तालीमदास फुलमाळी सह आदींचा सहभाग उल्लेखनीय होता.
शहराध्यक्ष रुपेश रायपुरे यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन शहर महासचिव ओमप्रकाश दारुंडे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप महेश निषाद यांनी आभार प्रदर्शन करून करण्यात आला.
