Latest Posts

नवी मुंबई विमानतळाला एरोड्रोम परवाना : उड्डाणांना मंजुरीचा मार्ग मोकळा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी मुंबई (navimumbai): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नियमित उड्डाणांसाठी महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून (DGCA) एरोड्रोम लायसन्स जारी करण्यात आल्याने आता या विमानतळावरून विनाअडथळा उड्डाणे होऊ शकणार आहेत.

सुरक्षा व तांत्रिक पूर्ततेला मान्यता –
विमानतळाचे रनवे, टर्मिनल, आपत्कालीन सेवा, अग्निशमन यंत्रणा आदी आवश्यक सुविधा सुरक्षेच्या निकषांनुसार उभारण्यात आल्याचे प्रमाणित करत हा परवाना देण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ही प्रक्रिया रखडली होती. अखेर आता मंजुरी मिळाल्याने विमानतळाच्या संचालनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुढील आठवड्यात उद्घाटनाची शक्यता –
नवी मुंबई विमानतळ प्रवासी वाहतुकीस सज्ज झाले असून, पुढील आठवड्यात उद्घाटन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित यंत्रणांनी यासाठी तयारी सुरू केली आहे.

डिसेंबरअखेरपासून प्रवासी सेवा सुरू होणार –
परवाना मिळाल्यानंतरही प्रत्यक्ष प्रवासी व मालवाहतूक सेवा सुरू होण्यासाठी किमान दोन महिने लागणार आहेत. त्यामुळे डिसेंबर अखेरीस नवी मुंबई विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

नव्या युगाची नवी सुरुवात –
मुंबई परिसरातील हवाई वाहतूक दाब कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या या विमानतळाच्या उड्डाणांना आता मंजुरी मिळाल्याने नव्या युगाची सुरुवात झाली, असे मानले जात आहे.

Latest Posts

Don't Miss