विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : राज्यातील अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन २०२५ – २०२६ या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्ती करीता अर्ज स्विकारण्यासाठी १ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, अल्पसंख्यांक समुदायातील परदेशात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी https://fs.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर विहित नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज, वाचनीय व सुस्पष्ट कागदपत्रे ऑनलाईन सादर करुन त्याची सुस्पष्ट प्रिंट, ऑफलाईन नमुन्यातील अर्जासोबत समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पूणे या कार्यालयास १ सप्टेंबर पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजतपर्यंत सादर करावी.
सन २०२५ – २०२६ साठी यापूर्वी अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांना परत अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अधिक माहितीसाठी शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावरील ताज्या घडामोडी या लिंकवर भेट द्यावी, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी कळविले आहे.
