Latest Posts

जैन कलार समाजाचा स्नेहमिलन सोहळा

– कोजागिरी व सत्कार : समाज हिताच्या दृष्टीने विचारमंथन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : जैन कलार समाज गडचिरोलीच्या पुढाकाराने शहरातील जैन कलार समाजाचा स्नेहमिलन सोहळा व कोजागिरीचा कार्यक्रम मंगळवार ३१ ऑक्टोबर रोजी चामोर्शी मार्गावरील कात्रटवार सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. समाज हिताच्या विषयावर समाजाच्या प्रगतीसाठी विचारांचे आदानप्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्हा जैन कलार समाज न्यासचे अध्यक्ष रतन शेंडे होते. उद्घाटन मध्यवर्ती कार्यकारिणी संचालक भूषण समर्थ यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून जैन कलार समाज बचत गटाचे अध्यक्ष प्रदीप रणदिवे उपस्थिती होते.

सर्वप्रथम कुसुम रणदिवे व ज्योती मोरघरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नवागत समाज बांधवांचा परिचय करून घेण्यात आला.

यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिक लीला भिवापूर, विजया समर्थ, मंजुळा रणदिवे, यशोदा हरडे, पुष्पा भिवापूर, पुष्पा कवठे, कमल वैरागडे, नलिनी लांजेकर, जिजा समर्थ, कमल दडवे, सतीश आदमने, भानुदास डोर्लीकर, परशुराम समर्थ, भूषण समर्थ, कमल हजारे, लीला दहिकर आदींसह सेवानिवृत्त कर्मचारी ज्योती मुरकुटे, शिल्पा आदमने यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थी यश भांडारकर, नंदिनी दडवे यांचाही सन्मानचिन्ह व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या निमित्याने मनमोकळीक, मनोरंजनात्मक, उत्साहवर्धक व स्नेहपूर्ण वातावरणात उपस्थित समाजबांधवांनी स्नेहभोजन व रात्री कोजागिरीचा आनंद घेतला. एकमेकांसोबत संवाद साधून समाज हितासाठी नियोजनात्मक विचारमंथन केले.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना रतन शेंडे म्हणाले, आजच्या काळात समाज एकसंघ राहणे खूपच महत्त्वाचे आहे. कलार समाजामध्ये गुणवंताची कमी नाही. मात्र समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन मागे पडलेल्या घटकाला पुढे नेणे गरजेचे आहे. यासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या समाज बांधवांना पुढाकार घ्यावा लागेल. कलार समाज एकता टिकवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. उपस्थित मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायली मुरकुटे तर संचालन जिल्हा जैन कलार समाज न्यासचे सचिव पांडुरंग पेशने यांनी केले. मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली लाड यांनी केले. आभार बचत गटाचे सचिव मनोज कवठे यांनी मानले.

कार्यक्रमात नितीन डवले, प्रदीप लाड, हेमंत डोर्लीकर, डॉ.उमेश समर्थ, सुधीर शेंडे, ॲड. अरुण रणदिवे, राजेंद्र लांजेकर, महेश मुरकुटे, राजू घुगरे. किशोर भांडारकर, कविश्वर बनपूरकर, सुरेश वैरागडे, सुनील हजारे, प्रमोद शेंडे, स्वाती कवठे, भाग्यश्री शेंडे, सुरेखा रणदिवे, अरुणा लांजेकर, स्नेहा शेंडे, सरिता पेशने, अर्चना मानापुरे, अर्चना भांडारकर, कल्पना लाड, डॉ. पियुषा समर्थ, रीना दडवे, लता मुरकुटे, विराग रणदिवे, घनश्याम हट्टेवार, मंगेश खेडीकर, प्रदीप खेडीकर, दिलीप आष्टेकर, राजेंद्र खानोरकर, गणेश हरडे, श्रीधर कवठे, तुकाराम तिडके आदींसह जैन कलार समाजबांधवांनी बहुसंख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

Latest Posts

Don't Miss