– मोठ्या संख्येने तेली समाजाने लाभ घ्यावा : द्वारकाप्रसाद सातपुते
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी (chamorshi) : समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींना योग्य जीवनसाथी मिळावा आणि पालकांना योग्य निर्णय घेण्यासाठी मदत व्हावी या उदात्त हेतूने निशुल्क तेली समाज वधू-वर परिचय व नोंदणी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हा भव्य मेळावा येत्या रविवार, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता श्री संताजी भवन, चामोर्शी, जि. गडचिरोली येथे पार पडणार आहे.
या मेळाव्यात गावगाड्यातील तसेच शहरातील शिक्षित व उच्चशिक्षित युवक-युवतींच्या स्थळांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे पालक व नातेवाईकांना एकाच दिवशी जास्तीत जास्त स्थळांचा परिचय होऊन वेळ, खर्च आणि श्रमांची बचत होणार आहे. लग्न जुळवण्यापूर्वी परस्पर परिचय होणे आवश्यक आहे.
त्यामुळे समाजातील युवक-युवतींना आपला योग्य जोडीदार निवडण्यासाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. कार्यक्रम पूर्णतः सुव्यवस्थित, पारदर्शक आणि समाजहितकारी पद्धतीने पार पडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या मेळाव्याचे आयोजन श्री द्वारकाप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्था, आरमोरी यांच्या सौजन्याने करण्यात आले असून Wadhuwar Parichay OPC Pvt. Ltd. व तेली समाज बांधव यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
ऑनलाईन तसेच ऑफलाईन नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
\संपर्क : ८६९८६९०८७१, ९४२१८५४८६८, ८२०८२७४६७१संकेतस्थळ : rashtriyatelisamaj.com
Teli Samaj Wadhuwar Matrimony App (Google Play Store वर उपलब्ध)
समाजातील सर्व बांधव, माता-भगिनी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून युवक-युवतींसाठी योग्य जीवनसाथी निवडण्याच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
