Latest Posts

२१ फेब्रुवारीपासून बारावी तर १ मार्चपासून दहावीची परीक्षा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी, बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान तर दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे.

परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उद्या उपलब्ध केले जाणार आहे.

दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १० ते २९ फेब्रुवारी दरम्यान तर बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ ते २० फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे.

परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधून मिळणाऱ्या छापील वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे, अशा सूचना राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिल्या आहेत. अन्य वेबसाईटवरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून प्रसिध्द झालेले वेळापत्रक विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळामार्फत करण्यात आले आहे.

असे असेल वेळापत्रक
सविस्तर वेळापत्रक आज येथे पाहता येणार www.mahasscboard.in

Latest Posts

Don't Miss