विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी परीक्षा २०२२ चा निकाल २९ मार्च रोजी जाहीर झाला. या परीक्षेत चंद्रपूर नगिनाबाग येथील योजना अशोक बावरे, हि १४ व्या श्रेणित उत्तीर्ण झाली आहे.
योजना हिने विधी शिक्षण गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई येथून पूर्ण केले व एलएलएम विश्वकर्मा विद्यापीठ पुणे येथे झाले. योजनाची आई चंद्रपूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत काम करते तिला लहान भाऊ व मोठी बहीण आहे. ३ वर्षा आधी बाबाचे छत्र हरवले असताना आईच्या प्रेरणेने योजना जिद्दीने न्यायाधीश पदापर्यंत पोहचली तिला कोर्टातील ज्ञान व मार्गदर्शन वरिष्ठ अधिवक्ता फरहात बेग व पुणे येथील अॅड गणेश शिरसाठ यांचे कडून मिळाले.
योजना म्हणते न्यायाधीश बनण्याची प्रेरणा मला आई – बाबा कडून मिळाली आहे. मला वाटत कि, प्रत्येक मुला मुलीने कठीण परिस्थितीचा सामना करून मनात जिद्द ठेवली तर यश नक्कीच मिळत असते. योजनाचे जन आधार अधिवक्ता संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
