विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्हा पोलीस दलाने पोलीस शिपाई आणि चालक पोलीस शिपाई पदांसाठीची तात्पुरती लेखी परीक्षा गुणांची यादी प्रसिद्ध केली आहे. चालक पोलीस शिपाई पदासाठीची लेखी परीक्षा १८ मार्च २०२६ रोजी, तर पोलीस शिपाई पदासाठीची लेखी परीक्षा २२ मार्च २०२६ रोजी घेण्यात आली होती.
सर्व उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी अधिकृत संकेतस्थळावर [www.gadchirolipolice.gov.in](http://www.gadchirolipolice.gov.in) उपलब्ध आहे. उमेदवारांना या यादीत काही आक्षेप असल्यास, यादी प्रसिध्द झाल्यापासून २४ तासांच्या आत त्याची नोंद करणे आवश्यक आहे. यापुढे, या मुदतीनंतर प्राप्त होणारे कोणतेही आक्षेप मान्य केले जाणार नाहीत.
सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी आणि वेळेत आवश्यक तक्रार नोंदवावी, असे गडचिरोली पोलीस दलाने स्पष्ट केले आहे.
