Latest Posts

राष्ट्रहितासाठी कार्य करा : माजी आमदार डॉ. देवराव होळी

– महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) आढावा बैठक व सन्मान सोहळात माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची उपस्थिती.

– जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे आढावा बैठकिचे आयोजन

– कर्तबगार शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल महिला शिक्षिकांचा सन्मान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : जिल्हा नियोजन भवन, येथे अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ, नवी दिल्ली संलग्नीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) यांच्या वतीने विभागीय आढावा बैठक व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्म जयंती निमित्त जाहिर व्याख्यान कार्यक्रमात माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी उपस्थिती दर्शविली.

यावेळी प्रामुख्याने आ. डॉ. मिलिंद नरोटे, किशोर ओलालवार, गुंफा अंबादे, भिखा पटेल, मधुकर उन्हाळे, पुरुषोत्तम काळे, अविनाश तालापल्लीवर, बाबासाहेब पवार, सुनीता मेहता, विजय साळवे तसेच शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss