विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही (sindewahi) : सिंदेवाही तालुक्यातील पेटगाव येथील काही महिला रोवण्यासाठी आज १८ जुलै ला गावापासून १ कि.मी वर असलेल्या विरव्हा शेतशिवारात चंदु टेकाम यांच्या शेतात गेल्या होत्या. दुपारच्या २ वाजताच्या सुमारास विज कड़ाडासह पाऊस आला. त्यामधे आकस्मिक विज पडुन पेटगाव येथील संगिता सचिन चौधरी वय ३७ वर्ष हिचा जागीच मृत्यू झाला. तर विठ्ठल केशव शेरकुरे वय ४५, इंदिरा जनार्दन चौधरी वय ४५, जनार्दन तुळशिराम चौधरी हे तिघेही गंभीर जखमी झाले. जखमींना पेटगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात भरती करण्यात आले आहे. या विजेच्या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृतकाला शेताच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी मर्ग दाखल करून पंचनामा केला आहे.
पुढील तपास पोलिस निरीक्षक कांचन पांडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद बावणे करीत आहेत.
