Latest Posts

वरोरा शहरात परप्रांतीयांच्या अवैधरित्या मटण विक्री विरोधात स्थानिक खाटीक समाज संघटना आक्रमक

– परप्रांतीय मटण विक्रेत्या विरोधात मनसे करणार खळखट्याक आंदोलन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा (Warora) : वरोरा शहरात जुन्या मटण मार्केट मध्ये जें नोंदणीकृत खाटीक समाजाचे दुकानदार आहेत तें व्यवसाय करतात पण आता या धंद्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय खाटीक घुसल्याने स्थानिक मराठी खाटीक समाजाच्या मटण विक्रीच्या धंद्यावर मोठे संकट ओढवले असल्याने वरोरा येथील बहुउद्देशीय खाटीक समाज संस्थे द्वारा संचालित खाटीक समाज संघटनेचे अध्यक्ष काळुमामा उर्फ पुंडलिक कटारे, सचिव सागर पारवे, कोषाध्यक्ष चंद्रकांत हिकरे यांनी पुढाकार घेऊन परप्रांतीयानी वरोरा शहरातील बोर्डा चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती व मावेळी नाका येथे बेकायदेशीर मटण दुकाने बाटल्याने त्या विरोधात नगरपरिषद वरोरा मुख्याधिकारी, स्थानिक पशुसंवर्धन अधिकारी यांना निवेदने देऊन परप्रांतीयांचे मटण विक्रीचे दुकानं तात्काळ गावातून उठवा अन्यथा खाटीक समाज संघटना नगरपरिषद च्या भ्रष्ट कारभाराविरोधात मोठे आंदोलन करेल असा इशारा प्रशासनाला दिला आहे.

या संदर्भात नागपरिषद बरोरा तर्फे संबंधिताना नोटीस पण दिले आहें मात्र अजूनपर्यंत परप्रांतीयांचे मटण विक्रीचे बेकायदेशीर दुकाने बंद झाले नाही त्यामुळे मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांना याबाबत कळवले असता त्यांनी खाटीक समाज संघटनेला पाठिंबा दिला असून परप्रांतीय मटण विक्रेत्या विरोधात मनसे कडून सुद्धा खळखट्याक आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे च्या वरोरा येथील राजगड कार्यकायात झालेल्या पत्रकार परिषदेतून नगरपरिषद प्रशासनाला दिलेला आहें.

यावेळी खाटीक समाज संघटनेचे अध्यक्ष काळुभाऊ उर्फ पुंडलिक कटारे, सचिव सागर पारवे, उपाध्यक्ष रमेश कटारे, कोषाध्यक्ष चंद्रकांत हिकरे, सदस्य अशोक पारधी, प्रकाश कटारे, शाम हिकरे, अशोक हिकरे, कुणाल बेहार, अरुण हिकरे, सुनील कटारे, सतीश हिकरे, शरद पारधी, सुरेश हिकरे, दिपक पारधी इत्यादीची उपास्थिती होती.

शहरातील नगरपरिषद मध्ये सध्या प्रशासक असून मुख्याधिकारी सुद्धा इथे नियमित कार्यरत नाही, येथील आरोग्य व्यवस्थाचं जणू व्हेंटिलेटरवर असून शहरातील आरोग्याच्या दृष्टीने कुठलेही ठोस काम नाही अशातच बाहेर प्रांतातील लोकं येऊन इथे मटण विक्रीचे दुकानं रस्त्याच्या कडेला थाटून वेस्टेज मटेरियल उघड्यावर टाकत असल्याने त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरून परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

परप्रांतीयांनी केवळ एकच मटण विक्रीचे दुकानं थाटले नाही तर तब्बल ५ दुकाने थाटले आहे आणि पुन्हा १५ दुकाने सुरु करण्याच्या तें तयारीत असून निकृष्ट दर्जाचे मटण कमी दरात विकून तें स्थानिक मराठी खाटीक समाजाच्या परंपरागत मटण विक्रीच्या धंद्यावर परिणाम करत असल्याने आता खाटीक समाज संघटना रस्त्यावर उतरून परप्रांतीय मटण विक्रीचे दुकान नगरपरिषदने बंद पाडले नाही तर स्वतः बंद पाडेल असा इशारा देण्यात आला आला आहे. दरम्यान या आंदोलनात मनसे पदाधिकारी उतरल्यास मोठा हंगामा होईल त्यामुळे आता नगरपरिषद प्रशासन या संदर्भात काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहें.

Latest Posts

Don't Miss