Latest Posts

बीआयटी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (ballarpur) : बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव पार पडला. या महोत्सवादरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभागी दर्शविला.

सदर क्रीडा महोत्सवात बुद्धीबळ स्पर्धेत शुभम येरला प्रथम आणि इबाद शेख याने द्वितीय क्रमांक मिळविला. गर्ल्स कॅरम डबलमध्ये नामिक्षा मुळे, सानिया चांदेकर प्रथम तर कल्याणी पोहणे, महिमा तंगराम यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. बॉईज कॅरम डबलमध्ये रोहीत चापले, भार्गव चिडे यांनी क्रमांक मिळविले. कॅरम सिंगलमध्ये गायत्री काटकमवार व आशिष रामटेके यांनी प्रथम क्रमांक मिळविले. बॉईज बॅडमिंटन डबल मध्ये यशराज चिंतावर, साहिल वैद्य, गर्ल्स बॅडमिंटन डबलमध्ये यशा रानिंग, वांशिता अंबेडकर, बॉईज बॅडमिंटन सिंगलमध्ये यशराज चिंतावर, गर्ल्स बॅडमिंटन सिंगलमध्ये श्रेयल खासरे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. प्राध्यापकांच्या बॅडमिंटन स्पर्धेत सोनल ठाकूर, स्वागता कावळे यांनी क्रमांक पटकाविले.

गर्ल्स रस्सीखेच स्पर्धेत श्रुती जमदाडे आणि चमू यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. बॉईज रस्सीखेच स्पर्धेत केतन वासाडे आणि चमू यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. व्हॉलीबॉल स्पर्धेत मोहम्मद शाहिद ग्रुपने प्रथम क्रमांक पटकाविला. व्हॉलीबॉल स्पर्धेत मिताली भटारकर ग्रुपने प्रथम क्रमांक मिळविला. बॉईज कबड्डी स्पर्धेत मायनिंग शाखेने प्रथम क्रमांक पटकाविला. गर्ल्स कबड्डी स्पर्धेत एमबीए शाखेने प्रथम क्रमांक पटकाविला. गर्ल्स क्रिकेट स्पर्धेत प्रथम वर्ष इंजिनिअरिंग ग्रुपने प्रथम क्रमांक पटकाविला. बॉईज क्रिकेट स्पर्धेत प्राध्यापक संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.

सर्व विजेत्या स्पर्धकांना महाविद्यालयातर्फे मानचिन्ह आणि रोख रक्कम देण्यात आली. यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब वासाडे, कार्याध्यक्ष संजय वासाडे, संचालक डॉ. रजनीकांत मिश्रा, पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत गोजे, प्रा. विपीन गुलघाने, प्रा.विशाल पिंपळकर, प्रकाश सातपैसे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयातील केतन वासाडे, शुभम लहाने, महिमा तंगराम, अमेय लोखंडे, मोहम्मद शहीद, सानिका अदबले, आरती चंदनखेडे, यशराज चिंतावर, समीक्षा काकडे, रोहीत झिल्लेवार, नयन गौरकार, भार्गव चिडे, ऋषिकेश नागपुरे यांनी परिश्रम घेतले.

Latest Posts

Don't Miss