Latest Posts

वाहन चोरी व इतर चोरी करणारे गुन्हेगार अटक, २ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त : वरोरा पोलिसांची ची कार्यवाही

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : १० एप्रिल, २०२५ रोजी पोलीस स्टेशन वरोरा हद्दीत मोटार सायकल चोरी चे गुन्हे तसेच इतर चोरी व घरफोडीचे गुन्हे करणारे गुन्हेगारां विरुध्द विशेष मोहीम राबवुन ५ आरोपींना अटक करत २ लाख २७ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केले.

अपराध क्रमांक १२९ / २०२५ कलम ३७९ भादंवि मधील आरोपी ओम अरविंद गहणेवार रा. वरोरा यास अटक करुन त्याचे कडुन मोटार सायकल क्रमांक MH34-J-9347 किंमत ४५ हजार रुपये, अपराध क्रमांक २५० / २०२५ कलम ३०५ (अ) भा. न्या. सं. मधील आरोपी अबुसैज जमाल मेकराणी रा. गझी उत्तरप्रदेश यास अटक करुन त्याचे कडुन रोख रक्कम ९ हजार ५०० रुपये, अपराध क्रमांक २४३/२०२५ कलम ३०३ (२) भा. न्या. सं. मधील आरोपी मारोती पाचोरे रा. वेळकी जि. यवतमाल यास अटक करुन त्याचे कडुन एक मोपेड क्रमांक MH34 – BY – 9169 किंमत ७० हजार रुपये, अपराध क्रमांक २४१ / २०२५ कलम ३०५ (अ), ३३१ (४), ३३१ (३) भा.न्या. सं. मधील आरोपी  संगिता गजानन बल्ललवार रा. कॉलरी वार्ड वरोरा हिला अटक करून तिचे कडुन एक गॅस सिलेंडर, रेग्युलेटर, बर्नर किंमत २ हजार ९७० रुपये, अपराध क्रमांक ०४ / २०२५ कलम ३०९ (४), ११५ (२) ३ (५) भा. न्या.सं. मधील आरोपीकडुन एक ॲपल कंपनीचा मोबाईल आयफोन किंमत १ लाख रुपये असा एकुण २ लाख २७ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल  जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा नयोमी साटम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे, पोउपनि दिपक ठाकरे पोहवा मोहनलाल निशाद, दिलीप सुर, संदीप वैद्य, अमोल नवघरे, पोअं महेश गावतुरे, विशाल राजुरकर, संदीप मुळे, मनोज ठाकरे सर्व पोलीस स्टेशन वरोरा यांनी केली आहे.

Latest Posts

Don't Miss