विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : सध्या ज्ञानाचे आणि स्पर्धेचे युग आहे. आणि ज्ञान वाढविण्यासाठी सोशल मीडिया हा एकमेव साधन आहे. याचा योग्य वापर हा व्यवसायासाठी खूप फायदेशीर असेल त्यामुळे सोशल मीडिया चा वापर व्यवसाय वृद्धी साठी करा असे मत नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी चंद्रकांत शेळके यांनी व्यक्त केले.
ते ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित आणि बँक ऑफ इंडिया द्वारा संचालित ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटि ) गडचिरोली येथे वस्त्र चित्र कला उद्यमी या ३१ दिवसीय निवासी प्रशिक्षणच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या प्रसंगी जिल्हा उद्योग केंद्र गडचिरोली च्या उद्योग निरीक्षक पूनम कुसराम, वरिष्ठ तज्ज्ञ मार्गदर्शक गंगाधर दाभाडे , आरसेटि चे वारिष्ट कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम आणि पुरुषोत्तम कुनघाडकर, वस्त्र चित्र कला या प्रशिक्षणाच्या तज्ज्ञ मार्गदर्शिका सुनीता भारद्वाज आणि प्रशिक्षणार्थी महिला व मत्स्यव्यवसाय या प्रशिक्षणाचे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्रशिक्षणार्थी महिला दीपिका अरिंदा आणि सरिता मडावी यांनी आपल्या मनोगतातून संपूर्ण प्रशिक्षणाचा आढावा घेतला.
कपड्यावर तसेच इतर साहित्यावर कला तयार करून त्याचा व्यवसाय करणे या करीता वस्त्र चित्र कला ह्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या मध्ये संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातून ३५ महिला प्रशिक्षणार्थी यांनी हजेरी लावली. संपूर्ण प्रशिक्षण निवासी आणि मोफत दिल्या गेले. या प्रसंगी महिला प्रशिक्षणार्थीना बनविलेल्या कलेचे आणि विविध वास्तूचे आरसेटि बाजार अंतर्गत स्टॉल लावून प्रदर्शन करण्यात आले.
जिल्हा उद्योग केंद्राच्या पूनम कुसराम यांनी अनुदानाच्या योजनांची माहिती दिली आणि आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहाय्य करेल याची ग्वाही दिली. वरिष्ठ तज्ज्ञ मार्गदर्शक गंगाधर दाभाडे जी यांनी सगळ्या शासकीय योजनांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ घ्यावा असे आवाहन केले.
आरसेटी चे हेमंत मेश्राम यांनी प्रशिक्षणार्थ्यांना आपला व्यावसाय सुरु करून बँकांच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. आरसेटि श्रेष्ठता केंद्राचे प्रतिनिधी पुंडलिक काटकर आणि शैला गिरी यांनी प्रशिक्षणाचे मूल्यमापन केले यात सगळे प्रशिक्षणार्थी यशस्वी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशिक्षण समन्वयक पुरुषोत्तम कुनघाडकर यांनी केले.
