विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुमसर येथे निर्लेखित केलेल्या साहित्य याच्या विक्रीसाठी इच्छुक खरेदीदार यांचेकडून दोन लिफाफे पध्दतीने २२ एप्रिल, ते २८ एप्रिल, २०२५ रोजी दुपारी ३:०० वार्जपर्यत पर्यंत निविदा मागविण्यात आलेली आहे. निविदेचा संपूर्ण तपशिल, निविदा अर्ज, अटी व शर्ती इत्यादी
https://nagpur.dvet.gov.in/bhandara-institute/government-industrial-training institute-tumsar-tah-tumsar-dist-bhandara या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेले आहे. करिता सर्व इच्छुक व पात्र खरेदीदार यांनी प्रत्यक्ष कार्यालयातून किंवा संकेतस्थळावरुन निविदा अर्ज करुन विहित मुदतीत भरावी. असे आवाहन प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुमसर यांनी कळविले आहे.
