Latest Posts

अवकाळी पाऊस, वादळ, गारपीट व ओल्यांमुळे झालेल्या नुकसानीचा आमदार विनोद अग्रवाल यांनी घेतला आढावा

– प्रशासनाला पंचनाम्याचे दिले निर्देश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया (Gondia) : अवकाळी पाऊस, जोरदार वारे, गारपीट व ओल्यांमुळे गोंदिया तालुक्यातील ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, सलग दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे व वादळी वाऱ्यांमुळे अनेक घरांचे, शेतांचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या कठीण परिस्थितीत आमदार विनोद अग्रवाल यांनी स्वतः गावागावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि पीडित नागरिकांशी थेट संवाद साधला.

गावागावात जाऊन नुकसानाचे थेट मूल्यांकन –

आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया तालुक्यातील अनेक ग्रामीण गावांना भेट देऊन नुकसानाची तीव्रता समजून घेतली. त्यांनी शेतात जाऊन पीक परिस्थिती पाहिली – जिथे भाताच्या फुलांवर गाळ साचलेला होता, पाण्यामुळे भाताचे पीक कुजत होते आणि शेतकरी चिंतेत होते.

प्रशासनाला स्पष्ट निर्देश – पंचनाम्यात कोणतीही हलगर्जीपणा नको –

या नैसर्गिक आपत्तीतून झालेल्या नुकसानीचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी आमदारांनी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना त्वरित संयुक्त पंचनामे सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

साहाय्य कार्याला वेग –

आमदारांच्या दौऱ्यानंतर स्थानिक प्रशासनाने मदत कार्यात वेग आणला आहे. गावागावात नमीमापन, माती तपासणी, पीक परिस्थिती इत्यादींच्या आधारावर अहवाल तयार केला जात आहे, जेणेकरून शासनाला तात्काळ मदतीचा प्रस्ताव पाठवता येईल.

दौर्‍यावेळी उपस्थित मान्यवर –

या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी खंडाईत, जिल्हा कृषी अधिकारी निलेश कानवडे, तहसीलदार गोंदिया ग्रामीण पठाण, गटविकास अधिकारी पिंगळे, गोंदिया पंचायत समितीचे सभापती मुनेश रहांगडाले, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती दीपताई चंद्रिकापुरे, तालुका कृषी अधिकारी नेहा आढाव तसेच संबंधित गावांचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss