Latest Posts

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या गिग कामगार यांना ई-श्रम पोर्टलवर निशुल्क नोंदणी करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : केंद्र शासनातर्फे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा मोठा डाटाबेस तयार करून शासनास कामगारांसाठी उपयुक्त निती बनविणे शक्य होईल याकरिता सदर ई-श्रम पोर्टलची निर्मीती करण्यात आलेली आहे.

त्याअनुषंगाने ई-श्रम पोर्टल अद्यावत करण्यात आलेले असून, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या गिग कामगार (जसेकीओला, उबर, ॲमेजॅन, फ्लिपकार्ट, झोमाटो, स्विगी इत्यादी) या क्षेत्रात काम करीत असलेल्या कामगारांनी www.eshram.gov.inया अधिकृत वेबसाईटला भेट देउून कामगारानां स्वत: ई-श्रम पोर्टलवर निशुल्क नोंदणी करता येईल.

तसेच कामगारानां स्वत: नोंदणी करणे शक्य नसल्यास नजिकच्या सेतू केंद्र किंवा सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, गडचिरोली जिल्हाधिकारी संकुल, बॅरेक क्र. २, कॉम्पलेक्स येथे स्वत: प्रत्यक्ष उपस्थित राहून ई-श्रम पोर्टलवर निशुल्क नोंदणी करता येईल. यांची गिग कामगारांनी नोंद घ्यावी.

करिता गडचिरोली जिल्हयातील गिग कामगारांनी मोठ्या संख्येने ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी असे, आवाहन सरकारी कामगार अधिकारी, गडचिरोली यांच्या द्वारे करण्यात येत आहे.

Latest Posts

Don't Miss