– मुल तालुक्यातील खेडी – गोंडपिपरी मार्गावरील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शेतातील कामे आटोपून घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १० एप्रिल रोजी रात्री ८. ३० वाजता मुल तालुक्यातील नवेगाव भुजला – जुनासुर्ला रस्त्यावर घडली. तिरुपती देशमुख असे मृताचे नाव असून, जुनासुर्ला येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिरुपती बाबुराव देशमुख (४३ ) हे मूल तालुक्यातील जुनासुर्ला गावात राहत होते.
पाच वर्षांपूर्वी त्याची पत्नी तिच्या दोन मुलींसह सिंदेवाही तालुक्यातील वाढोणा गावात आई – वडिलांच्या घरी माहेरी राहायला गेली. १० एप्रिल रोजी सकाळी जेवण करून तिरुपती आपल्या शेतात कामाला गेले. तेथे काम आटोपून ते परतत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. जुनीसुर्ला चे सरपंच रणजीत समर्थ यांना माहिती मिळताच त्यांचे भाऊ नरेंद्र बाबुराव देशमुख यांनी उपजिल्हा रुग्णालय मुल येथे जाऊन भावाचा मृतदेह ठेवलेला पाहिला. नरेंद्र देशमुख यांच्या तक्रारीच्या आधारे मुल पोलीसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध हिट अँड रन कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मुल पोलीस करत आहे
