Latest Posts

अज्ञात वाहनाच्या धडकेत रानगव्याचा दुदैवी मृत्यू : लोहारा जवळील घटना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : चंद्रपूर कडून भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत  जवळपास १ हजार किलोच्या नर रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, धडक एवढी जोरदार होती कि रानगवा ३० फूट रस्त्याच्या खाली फेकल्या गेला व त्याचा तडफडून जागीच मृत्यू झाला. हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी चे अध्यक्ष दिनेश खाटे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर यांना फोन वरून घटनेची माहिती दिली, लगेच वनविभागाचे कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले.

चंद्रपूर – मूल हायवे हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प  च्या जंगलाला लागून असल्याने नेहमीच ह्या महामार्गवर वन्यप्राणी रस्ता ओलांडताना लोकांच्या नजरेस दिसतात, हा महामार्ग NH – ९३० नॅशनल हायवे कडे येत असून, त्यांना संस्थेकडून विनंती करण्यात आली होती कि, महामार्गाच्या लगतचे झुडपं काढून टाकण्यात यावं जेणेकरून वन्यप्राण्यांना व वाहतूक करणाऱ्या लोकांना रस्त्यावर येणार वन्यप्राणी निदर्शनास येईल पण, नॅशनल हायवे च्या अधिकाऱ्यांनी विनंतीकडे दुर्लक्ष केल्याने आज रानगव्याच्या मृत्यू झाला आहे.

चंद्रपूर – मूल हा महामार्ग वन्यजीवांचा भ्रमण मार्ग असून तो कावल व्याघ्र प्रकल्प – कन्हाळगाव अभयारण्य – ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प – उमरेड कऱ्हांडला ह्या जंगलांना जोडलेला आहे, ह्या महामार्गावर उपशमन योजना अनेक वर्षपासून प्रस्तावितच आहे, तो लवकर मार्गी लागावी ह्या साठी हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी नेहमी प्रयत्न करत आहे.

पण त्याला अजूनही यश आलेलं नाही, परिणामी वन्यजीवांना दुदैवाने अपघातात नाहक बळी जातांना आपण बघत आहोत, ह्या महामार्गावर ७ – ८ वर्षाच्या वेगवेगळ्या अपघातात  रानगवा जातीचा ह्या वन्यप्राण्याचा तिसरा बळी आहे, लोहारा, मामला फाटा व आज लोहारा जवळ रानगव्याला जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाला हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी कडून विनंती आहे कि लवकरात लवकर उपशमन योजना राबवून वन्यजीवांचे हक्काचे भ्रमणमार्ग सुरक्षित करावे. घटनास्थळी हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी चे अध्यक्ष, दिनेश खाटे, अमित देशमुख, नाजिश अली, ओंकार मत्ते वनपरिक्षेत्र अधिकरी नायगमकर, तिजारे, यादव मॅडम व पशुवैद्यकीय अधिकारी कुंदन पोडसेलवार घटनास्थळी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss