विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर(Nagpur) : जिल्हयातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर, मॉडेल करीअर सेंटर, नागपूर, वैनगंगा महाविदयालय, नागपूर तसेच लाईट हाउस कम्युनिटी फाउडेशन, नागपूर यांचे संयुक्त विदयमाने शुक्रवार २८ मार्च रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन वैनगंगा महाविदयालय, डोंगरगाव, वर्धा रोड येथे सकाळी १० ते दुपारी ५ पर्यंत करण्यात आलेले आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये Vaibhav Enterprises Nagpur, SBI Life Manishnagar, Nagpur, Replay International, Nubeno Pvt Ltd., Bajaj Steel Industries, ACC Cement, Perkins Pvt Ltd., Just dial, Quess Pvt. Ltd, Sahyog Multistate Pvt Ltd, Patle Group, Infinity Buildcon, Chromewell Engineering, इत्यादी ४० कंपन्या मार्फत २ हजार पाचशे पेक्षा जास्त जागांसाठी दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, आटीआय, डिप्लोमा इत्यादी पात्रताधारक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची प्राथमिक निवड केली जाणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगाराबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. याव्दारे जिल्हयातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी सदर रोजगार मेळाव्यामध्ये उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सुनंदा बजाज तसेच राजभूषण श्रीवास, यंग प्रोफेशल, मॉडेल करीअर सेंटर, नागपूर यांनी केले आहे.
