विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (chandrapur) : चंद्रपूर शहरात निमवाटिका रयतवारी परिसरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोन युवकांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून २० ग्रॅम मेफेड्रॉन (MD) पावडर, मोपेड गाडी व अन्य असा एकूण १ लाख ९२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विशाल रत्नाकर भोयर (२१), रा. रेहान किराणा स्टोअर जवळ, बगडखिडकी, चंद्रपूर, अब्दुल राशीद फुरेखी (२२), रा. नुरी चौक, दगडखिडकी, चंद्रपूर याना अटक करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व त्यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली. आरोपींच्या अंगझडतीत २० ग्रॅम MD पावडर व मोपेड गाडी मिळून आल्याने NDPS कायद्यान्वये रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवारे, रजनिकांत पूठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, पोअ किशोर वाकाटे, पोशि हिरालाल गुप्ता, अजित शेंडे, चापोशि रिक्षभ बारसिंगे, मीलिंद टेकाम ने केली.
