Latest Posts

ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक : १५ जखमी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (chandrapur) : ब्रह्मपुरी-नागभीड रस्त्यावर सायगाटा मंदिर फाट्याजवळ आज २७ मार्च रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. त्यात १४ प्रवाशी जखमी असून १ गंभीर झाले आहे.

नागपूरहून वडसाकडे जाणारी श्री ताज कंपनीची बस क्रं एमएच ४९ एटी ३०३० ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्रं एमएच ४० सीटी ५६९० ला धडक दिली. या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

या भीषण अपघातात १४ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून यामध्ये अजमेर पठाण  नागभीड, सुनंदा लोखंडे कुही, दीपिका मत्ते वडसा, चंद्रकला धोटे  नागपूर, कमलाबाई इंदूरकर नागपूर, पवन कराडे  नागभीड, मुस्कान पठाण नागभीड, निशांत मेश्राम मुल, कुणाल मडावी नागभिड, सचिन धोटे नागपूर,  गुड्डू धोंगडे नागपूर, एकनाथ गजभिये चिमूर, छत्रीसिंग बावणे वडसा, रोहित नवलाखे ब्रम्हपूरी, जितेंद्र गेडाम  हे गंभीर जखमी आहेत.

सर्व जखमींना तातडीने ब्रह्मपुरीच्या उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Latest Posts

Don't Miss