Latest Posts

उदयाला सामाजिक न्याय विभागाशी संबंधीत तक्रारीसाठी जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : राज्य शासनाच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर कार्यालयात २९ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ४ वाजता पर्यंत सामाजिक न्याय विभागाशी संबंधीत तक्रारीचे निराकरणासाठी विभागीय स्तरावर जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्या नागरिकांना समाज कल्याण विभागाशी संबंधीत  काही तक्रारी, समस्या, अडचणी असल्यास https://meet.google.com/fjw-fkhh-mzo या लिंकशी जोडून आपल्या तक्रारी सांगाव्या. सदर तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्यात येईल. असे आवाहन  समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss