विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यातील सुगंधित तंबाकु तस्कर हरीष ठक्कर याचा बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मानोरा गावातील गोडाउन वर ८ एप्रिल रोजी छापा टाकून लाखोंचा सुगंधीत तंबाकु जप्त केले.
पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना दिले. त्याअनुषगाने पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी वेगवेगळे पथके नेमुन त्यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. ०८ / ०४ / २०२५ गोपनिय बातमिदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी हरीष ठक्कर याचा मौजा मानोरा, ता. बल्लारशा, जि. चंद्रपुर येथे किरायाच्या गोडावून मध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाकु साठवून ठेवला आहे.
अशा खबरेवरुन मानोरा येथे जावून गोडावून ची झडती घेवून ईगल हुक्का सुगंधीत तंबाकु, होला हुक्का सुगंधीत तंबाकु तसेच मजा १०८ सुगंधीत तंबाकु असा एकुण ५ लाख ६ हजार ९१० रूपयांचा माल जप्त करून नमुद आरोपी हरीष अंबाराम ठक्कर, रा. विवेकानंद वार्ड, बल्लारशा, ता. बल्लारशा, जि. चंद्रपुर यांचेविरूध्द पोलीस स्टेशन बल्लारशा, जि. चंद्रपुर येथे अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुग्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस उपनिरीक्षक मधुकर चंद्रया सामलवार, सफौ धनराज करकाडे, पोहवा सुरेंद्र महतो, पोहवा चेतन गज्जलवार, पोअं प्रफुल गारघाटे,चापोअं मिलीद टेकाम स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.
