Latest Posts

बल्लारपूर च्या युवकाला दुचाकी चोरी प्रकरणात अटक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : गाडी नादुरुस्त झाल्याने रस्त्यात उभी करून ठेवलेली गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार दुचाकीमालकाने शहर पोलीस ठाण्यत केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीचा शोध घेत बल्लारपूर येथील अट्टल दुचाकी चोरट्याला अटक करून त्याच्याजवळून चोरीतील दुचाकी जप्त करण्यात आली आहे. दीपक उर्फ एटीएम अजय राजपूत (२०) रा. स्मशानघाट जवळ किल्ला वॉर्ड, बल्लारपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी अमित व्यंकटेश चिलमुलवार रा. देवाडा, चंद्रपूर हा युवक २३ नोव्हेंबर रोजी विसापूर येथून फटाके खरेदी करून चंद्रपूरकडे येत असताना बायपास मार्गावरील डॉ. एपीजे अब्दूल कलाम उद्यानासमोर त्याच्या दुचाकीत बिघाड आला. त्यामुळे त्याने गाडी उद्यानासमोर पार्किंग करून दुसऱ्या वाहनाने गावाकडे निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो दुचाकी आणण्यासाठी गेला. परंतु, ठेवलेल्या ठिकाणी दुचाकी आढळून आली नाही. त्यामुळे त्याने शहर पोलीस ठाणे गाठून दुचाकी चोरी झाल्याची तक्रार दिली.

या तक्रारीवरून अज्ञात दुचाकी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुचाकी चोरट्यांचा शोध घेत असताना गोपनीय माहितीवरून शहर पोलिसांनी बल्लारपुरातील दीपक उर्फ एटीएम अजय राजपुत या अट्टल दुचाकी चोरट्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या जवळून एम.एच. ३४ ए.क्यु. ११९३ ही दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शरीफ शेख, साहाय्यक फौजदार विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, संतोष पंडित, सचिन बोरकर, नीलेश मुडे, भावना रामटेके, चेतन गज्जलवार, इम्रान खान, दिलीप कुसराम, ईरशाद शेख, रूपेश रणदिवे, संतोष कावळे, विशाल बगडे यांच्या पथकाने केली आहे

Latest Posts

Don't Miss