Latest Posts

सांघिक खेळातून ऐकतेची भावना निर्माण करा : आमदार डॉ. देवराव होळी

– मौजा भेंडाळा येथे अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते उदघाटन
– भेंडाळा क्रिकेट क्लब भेंडाळा अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
– भेंडाळा राजीव गांधी उपसा सिंचन योजनेला मुख्यमंत्री महोदयांची मान्यता
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी (Chamorshi) : तालुक्यातील मौजा भेंडाळा येथे अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाट्न गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या उदघाटनीय भाषणात बोलतांना राजीव गांधी उपसा सिंचन योजना सिंचन प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिलेली आहे. सदर प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी येत्या अधिवेशनात निधीची तरतूद करून येत्या काही महिन्यातच सदर प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार असून या प्रकल्पा मुळे भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांना लाभ घेता येईल.

याप्रसंगी सरपंच कुंदा जुवारे, उपसरपंच विठ्ठल सातपुते, ग्रा.पं. सदस्य गंगाधर डांगे, भाजपा जेष्ठ नेते जयराम चलाख, ग्रा.पं. सदस्य संजय चलाख, अध्यक्ष चंदू झामपलवार, लोभेश गोर्लावार, निलेश येगलोपवार, मंगेश बोधलकर, छोटू सातपुते, कवेश बोधलकर, अंकुश वैरागडे, प्रितम सातपुते, टोनी खोब्रागडे, निखिल हजारे, मंडळाचे सदस्य तथा ग्रामस्थ उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss