Latest Posts

नगर परिषदेने केले २ दुकान गाळे सील

– नगर परिषदेची कार्यवाही जोरात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (ballarpur) : नगर परिषद बल्लारपूर कडून मालमत्ता कर वसुली अभियान जोरात सुरु आहे. कर वसुलीसाठी नगर परिषदेकडून वार्डात वसुली पथके तयार करून वसुली करण्यात घेत आहे. २७ मार्च २०२५ ला विवेकानंद वार्डातील रामसागर बेनबन्सी यांनी कराची थकबाकी वेळेत न भरल्या मुळे त्यांच्या मालकीचे २ दुकान गाळे सील करण्यात आले

सदर कार्यवाही बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांचे मार्गदर्शनात उपमुख्याधिकारी रविंद्र भंडारवार यांचे नेतृत्वात व प्रत्यक्ष उपस्थितीत करण्यात आली. यावेळी कार्यालय अधीक्षक नंदकिशोर सातपुते, कर निरीक्षक मोनाली वांढरे, लिपीक विक्रम लाहोरे, किशोर डाखोरे, रशीद शेख, शंकर रामटेके व वासिम खान उपस्थित होते. नगर परिषदेच्या अशा धडक कारवाईने शहरातील थकीत मालमत्ता धारक कर भरण्यासाठी गर्दी करत असल्याचे दिसत आहे.

नगर परिषदेकडून थकबाकीधारक मालमत्ता धारकांना जप्तीची नोटीस बजावून झालेली आहे. त्यामुळे जप्तीची कार्यवाही टाळण्यासाठी सर्वांनी विहित वेळेत मालमत्ता कराचा भरणा करून नगर परिषदेला सहकार्य करावे. थकबाकी धारकांची यादी चौकात प्रसिध्द करण्याची कार्यवाही देखील सुरु आहे. नगर परिषदेत कर वसुली प्रत्येक शनिवार व रविवार देखील सुरु राहणार असल्याने त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन बल्लारपूर नगर परिषदेने केले आहे.

Latest Posts

Don't Miss