Latest Posts

तालुक्याचा १८ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी विसापूर येथे सौर पारेषण प्रकल्पासाठी मौका पाहणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Balharpur) : बल्लारपूर चे तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर तालुक्यातील १८ गावांना लाभ देणाऱ्या ग्रीड प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी स्वतंत्र सौर आधारित पारेषण प्रकल्प स्थापन करण्याच्या दृष्टीने विसापूर येथे १८ जुलै रोजी मौका पाहणी करण्यात आली.

सदर प्रकल्पासाठी विसापूर येथील चंद्रशेखर कौरसे व इतर यांच्या मालकीच्या सर्वे क्रमांक १६६/४ या खाजगी जमिनीची उपयुक्तता तपासण्यात आली. या मौका पाहणीसाठी नायब तहसिलदार महेंद्र फुलझेले, उपविभागीय अभियंता, यांत्रिकी शाखा, जिल्हा परिषद, चंद्रपूर सचिन पोटुडे, ग्राम महसूल अधिकारी  आरती दुलत, विसापूर व इतर संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

सौरऊर्जेवर आधारित हा प्रकल्प उभारल्यास वीज दरावरील खर्च टळून शासनावर कोणतीही शासकीय आकारणी होणार नाही (शून्य आकारणी), तसेच दीर्घकालीन स्वरूपात शासनास व स्थानिक नागरिकांना या योजनेचा मोठा लाभ होणार आहे. हा प्रकल्प पर्यावरणपूरक असून स्वच्छ व सातत्यपूर्ण पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Latest Posts

Don't Miss