Latest Posts

ताडोबात बुद्ध पौर्णिमेनिमित्त निसर्गानुभव उपक्रम : १२ मे रोजी बफर क्षेत्रात अनोखा अनुभव

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : वाघ, बिबट्या व इतर वन्यजीवांच्या सान्निध्यात काही क्षण घालविण्याची अनोखी संधी ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात निसर्गप्रेमींना उपलब्ध होणार आहे. बुद्ध पौर्णिमेच्या औचित्याने, १२ मे २०२५ रोजी बफर क्षेत्रात निसर्गानुभव हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती ताडोबाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक आनंद रेड्डी यांनी दिली आहे.

या उपक्रमाअंतर्गत ताडोबाच्या बफर क्षेत्रातील चंद्रपूर, मूल, मोहर्ली, खडसंगी, पळसगाव व शिवणी या सहा वनपरिक्षेत्रांमध्ये एकूण ५० मचाणी (watch towers) सज्ज करण्यात आलेल्या आहेत. निसर्गप्रेमींना जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करण्यासाठी थेट मचाणीवर बसण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

बुकिंगची प्रक्रिया व कालावधी –
या उपक्रमासाठी २८ एप्रिल ते ५ मे २०२५ या कालावधीत ऑनलाईन बुकिंग सुरु राहणार असून, इच्छुक निसर्गप्रेमींनी http://mytadoba.mahaforest.gov.in/ या संकेतस्थळावर बुकिंग करायचे आहे. एकूण १०० निसर्गप्रेमी यामध्ये सहभागी होऊ शकतील.

शुल्क व अटी –
– प्रती व्यक्ती शुल्क – ४ हजार ५०० रुपये
– सुरुवातीला बुकिंग करताना ऑनलाईन १ हजार ५०० रुपये भरायचे आहेत व याची पावती संबंधित पर्यटन गेटवर दाखवावी लागेल.
– उर्वरित ३ हजार रुपये जिप्सी प्रवास व मार्गदर्शक शुल्काकरिता पर्यटन गेटवर रोख स्वरूपात भरावे लागतील.
– जिप्सी शुल्क : २ हजार रुपये
– मार्गदर्शक शुल्क : १ हजार रुपये

महत्त्वाच्या सूचना –
– सहभागी निसर्गप्रेमींनी स्वतःच्या शाकाहारी जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
– या उपक्रमात कॅमेरा व सर्चलाईट वापरण्यास बंदी आहे.
– अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

संपर्क : उपक्रमाविषयी काही अडचणी आल्यास कार्यालयीन वेळेत सुमित कोहळे (सहाय्यक पर्यटक व्यवस्थापक, उपसंचालक बफर कार्यालय, ताडोबा) यांच्याशी ८४२१४६१६९८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आनंद रेड्डी यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss