Latest Posts

उन्हाळ्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी नागपूर विभागातून रीवा- चारलापल्ली- रीवा दरम्यान विशेष गाडीची सेवा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : उन्हाळ्यात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, दक्षिण मध्य रेल्वेने रीवा आणि चारलापल्ली दरम्यान द्वै-साप्ताहिक ग्रीष्मकालीन विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्र. ०१७०४/०१७०३ रीवा – चारलापल्ली – रीवा एक्सप्रेस विशेष गाडी १.३ पट विशेष भाड्याने चालविण्यात येणार आहे.

गाडी क्र. ०१७०४ रीवा – चारलापल्ली द्वै-साप्ताहिक विशेष गाडी २४ एप्रिल २०२५ ते २५ मे २०२५ दर गुरुवार व रविवार दुपारी १३.०० वाजता रीवा येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १४.४५ वाजता चारलापल्ली येथे पोहोचेल. ही गाडी नागपूर स्टेशनवर दुसऱ्या दिवशी सकाळी ०४.३० वाजता येईल आणि ०४.३५ वाजता निघेल. (एकूण १० फेऱ्या)

गाडी क्र. ०१७०३ चारलापल्ली – रीवा द्वै- साप्ताहिक विशेष गाडी २५ एप्रिल २०२५ ते २६ मे २०२५ दर शुक्रवार व सोमवार सायंकाळी १६.५५ वाजता चारलापल्ली येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३.३० वाजता रीवा येथे पोहोचेल. ही गाडी नागपूर स्टेशनवर दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.२० वाजता येईल आणि ०६.२५ वाजता निघेल. (एकूण १० फेऱ्या)

थांबे : ही विशेष गाडी सतना, मैहर, कटनी मुडवारा, दमोह, सागर, बीना, राणी कमलापती, इतारसी, जुझारपूर, बेतूल, आमला, नागपूर, बल्लारशाह, शिरपूर कागजनगर, बेल्लमपल्ली, मंचेरियल, पेद्दापल्ली, काझीपेट, जंगावन या स्थानकांवर निर्धारित वेळेनुसार थांबेल.

कोच संरचना : या गाडीमध्ये एकूण २२ डब्बे असतील: २ SLR/डी, ४ सामान्य श्रेणी, १३ स्लीपर श्रेणी, २ वातानुकूलित तृतीय श्रेणी (AC ३-Tier), आणि १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी (AC २-Tier).

तिकीट आरक्षण : या विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वर उपलब्ध आहे. तपशीलवार वेळापत्रक आणि थांब्यांसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा.

Latest Posts

Don't Miss