Latest Posts

क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून युवक व युवतींनी करियर घडवावे : माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम

– आलापल्ली येथील क्रीडा संकुलात माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा हस्ते भव्य बॅटमिंटन स्पर्धेचे उद्घाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील क्रीडा संकुलात युनिक बॅटमिंटन क्रीडा प्रबोधिनी आलापल्ली तथा जिल्हा क्रीडा भारती अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य बॅटमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे होते.

यावेळी भव्य बॅटमिंटन स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी स्पर्धकांना संबोधित करतांना माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या युगात आपण आपली ध्येय पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, परिश्रम घ्यावे लागते तेव्हा आपण आपले ध्येय पूर्ण करू शकतो, आज प्रत्येक क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी स्पर्धा करावी लागते म्हणून आपण क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून करियर घडवावे, आपली प्रगती करावी आणि आपले भविष्य बनवावे, असे मत यावेळी युवक-युवतींना संबोधित करताना माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केले.

यावेळी भव्य बॅटमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी, महिला दुहेरी व पुरुष-महिला दुहेरी आणि एकेरी कनिष्ठ मुले या स्पर्धा खेळण्यात आल्या. प्रत्येकी प्रथम पुरस्कार आणि द्वितीय पुरस्कार माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम आणि अवधेशराव बाबा आत्राम यांच्या कडून देण्यात आले. त्यावेळी मोठ्या संख्येने स्पर्धकांनी भव्य बॅटमिंटन स्पर्धेत सहभाग घेतला होता.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एम. खोब्रागडे, प्रमुख पाहुणे म्हणून अवधेशराव बाबा, डॉ. साई चिमरालवार, प्रवीण बुरान, सुभाष शेंडे, संतोष जुनघरे, कु. शालू केशनवार, पूजा आत्राम, काजल मडावी, प्रियांका देवकर, कन्या मिरलवार हे उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss