विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (chandrpur) : आजकाल तरुणाईला सोशल मीडियाचे वेड लागले आहे. विशेषतः सोशल मीडियावर महिलांना लक्ष्य केले जात आहे. अशीच एक घटना नुकतीच मुल शहरात घडली आहे. वास्तविक सोशल मीडियाचे प्रेम मुलीच्या डोक्यात इतके गेले की ती त्याच्या प्रेमात पडली आणि आसाम गाठली. १९/ ०३ / २०२५ रोजी पोलीस स्टेशन मुल येथे एका पालकाने त्यांची १८ वर्षीय मुलगी ही मुल येथील कर्मविर महाविद्यालय येथे थी. ए प्रथम शिक्षण घेत असुन ती कॉलेजला जाते म्हणुन घरुन गेली परंतु ती रात्र होवुनही घरी परत न आल्याने वडीलांनी पोलीस ठाणे गाठुन मिसींग दाखल केले.
मुल पोलीस ठाणे प्रभारी प्रशि, उप अधीक्षक प्रमोद चौगुले यांनी सदर प्रकरणाची दखल घेवुन एक शोध पथक तयार केला. सदर पथकामध्ये पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी, महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम, पोहवा भोजराज मुंडरे, पो. अं. संदिप चौधरी यांची नेमणुक केली. शोधकार्या दरम्यान सदर मुलीकडे असलेल्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन सायवर सेल कडुन घेण्यात आले तेव्हा सदर मुलीचे लोकेशन कचर जिल्हा आसाम राज्य येथील दिसल्याने मुल पोलीस ठाणे प्रभारी प्रशि. उप अधीक्षक प्रमोद चौगुले यांनी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचेशी चर्चा करुन बाहेर राज्यात जाण्याची परवानगी घेवुन पोलीस अधीक्षक जिल्हा कचर आसाम राज्य यांना पत्रव्यवहार करण्यात आले व शोध पथकाला तात्काळ आसामकरीता रवाना करण्यात आले.
तोवर आसाम पोलीसांना मुलीचे लोकेशन व फोटो पाठवुन तिला ताब्यात घेण्याबाबत कळविले. शोध पचक दोन दिवसांनी आसाम राज्य येथील कच्चर जिल्हा येथे पोहचुन पोलीस अधीक्षक मा माहत्ता व अपर पोलीस अधीक्षक रंजित पॉल यांना भेटुन त्यांचे मार्गदर्शनात उदरबौंड पोलीस स्टेशन चे प्रभारी सी – इंग – सिम्स तिमुंग यांचे तसेच त्याचे पथकाचे सहयोगाने सदर मुलीस ताब्यात घेवुन मुल येथे परत आले व तिचे आईवडीलांचे ताब्यात दिले.
सदर पिडीत मुलीस विचापुस केली असता तिने तिची आपबिती सांगुन तिव्या मैत्रीनींना तसेच ईतर मुलींना संदेश दिला की इंन्स्टाग्राम, फेसबुक, स्नॉपचॉट आयडी वरून आलेल्या अनोळखी फ्रेंन्डरिक्स्टेला ॲक्सेप्ट केल्याने तिला समोरच्या व्यक्तीकडुन प्रेमाचे जाळयात ओडुन तिला लग्नाचे आमीष देवुन ब्लॅकमेल करण्यात आले व आत्महत्या करण्याची तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने तिला आसाम येथे जाण्यास भाग पाडले तरी अश्या कोणत्याही फ्रेंड रिक्वेस्ट ला बळी पडू नका असे संदेश देवुन सुखरूप येवुन आईवडीलांना भेटल्याने सदर मुलींने पोलीस यंत्रणेचे आभार व्यक्त केले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे तसेच प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन मुल पो. उप अधीक्षक, प्रमोद चौगुले यांचे मार्गदर्शनात पोलीस शोध पथकाने तांत्रिक सेलच्या सहयोगाने पार पाडली.
