Latest Posts

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांमार्फत वसतिगृहात प्रवेश अर्ज प्रक्रीया सुरु

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत भंडारा जिल्हयात खालीलप्रमाणे ३ मुलांचे व ६ मुलींचे असे एकुण ९ वसतिगृह कार्यरत आहेत. या वसतिगृहात सन २०२५ – २०२६ करीता प्रवेशाकरिता अर्ज प्रक्रीया सुरु झालेली आहे.

वसतिगृहाचे नाव व पत्ता   वसतिगृहाचे गृहपाल भ्रमणध्वनी क्रमांक –
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह सिव्हिल लाईन, भंडारा, वाय. एस. सावरबांधे, मो. क्र. ९४२३३७९६६९

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह तुमसर जि.लाईन,भंडारा, एस. एन. बारई, मो. क्र. ९४२२८३०३६७

– मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आयटीआय नगर,गडेगाव लाखनी जि. भंडारा, सुनिल बैतुले, मो. क्र. ९१३०८९८२५२

– मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह सिव्हिल लाईन,भंडारा, छाया फुलझेले,मो.क्र. ९७६५७७२६८५

– मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह नवीन भंडारा, टी. यु. गि. हेपुंजे, मो. क्र. ९२२५५५३६३३

– मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह नवीन लाखनी, कु. ए. एस. बडोले, मो. क्र. ७८७५८४८९५३

– मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह,गडकुंभली रोड, साकोली. जि. भंडारा, ए. एस. बडोले, मो. क्र. ७८ ७५८४८९५३

– मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह अर्जुनी मोरगाव रोड, लाखादूर, जि. भंडारा, छाया झोडे, मो. क्र. ८३९०४९७१३५

– मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह सिदपूरी पवनी, जि. भंडारा, अंशिका सायरे, मो.क्र. ९०२१२६८४२२

– तरी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी

https:/ /hmas. mahait.org या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरुन सदर ऑनलाईन भरलेला अर्ज डाऊनलोड करुन त्याची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे संबंधित वसतिगृहास सादर करावी. अधिक माहितीकरिता संबंधित वसतिगृहाचे गृहपाल यांचेशी संपर्क साधावा.जिल्हयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वसतिगृह योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त, आशा कवाडे, यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss