Latest Posts

शक्ती नगर वेकोलि वसाहातील नाली व गटार सफाई कडे वेकोलि प्रशासनाचे दुर्लक्ष

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : शक्ती नगर वेकोलि वसाहातील नाली व गटार यांची बऱ्याच दिवसापासून साफ सफाई झालेली नाही नाली व गटार ची स्वच्छता होत नसल्यामुळे येथील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने अनेक समस्यांना सामोरं जावे लागत आहे. वेकोली प्रशासनाला माहिती दिली असूनही त्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे असा आरोप बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टी चंद्रपूर तालुका संयोजक महेंद्र झाडे यांनी वेकोली महाप्रबंधक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे.

त्याच सोबत शक्तिनगर वेकोलि वसाहत येथे नेहमीच जंगली जनावरांचा हैदोस सुरु असुन त्यात कित्येक लोकांना आपला जीव गमवावे लागले आहे.व आणखी किती जीव गमवावे लागेल असा प्रश्न ही उपस्थित केला आहे,तरी या बाबीकडे सुध्दा वेकोलि प्रशासन हे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करीत ह्या समस्ये कडे वेकोलि प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास वेकोलि प्रशासनाविरोधात तीव्र जन आंदोलन करण्यात येईल असा ईशारा बि. आर. एस. पी. चंद्रपुर तालुका संयोजक महेंद्र झाडे यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आले आहे.

सदर निवेदन देताना धम्मदिप बांबोळे, कमलताई तुरे, संगीता बनकर, लता गोंडाणे, सुशिल वानखेडे, उमाशंकर भैसारे, प्रताप रंगारी, किरण वानखेडे व शक्तिनगर कॉलनीतील ईतर महीला उपस्थित होत्या.

Latest Posts

Don't Miss