विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : वृध्द साहित्यीक व कलावंत यांच्यासाठी शासनाच्यावतीने राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यीक व कलावंत सन्मान योजना राबविण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ३१ जुलै पर्यंतऑनलाईन प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे ५० पेक्षा जास्त असावे. दिव्यांगांठी ४० वर्ष राहील. लाभार्थ्यांचे कला व साहित्य क्षेत्रातील कमीत कमी १५ वर्ष योगदान असावे. साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यपुर्ण, दर्जेदार मोलाची भर घातली असावी. वयाने जेष्ठ असणारे, विधवा, परितक्त्या, दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहील.
कलाकाराचे सर्व मार्गानी कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न ६० हजार पेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकाराची उपजीविका फक्त कलेवरच उवलंबून आहे. असे कलाकार तसेच जे कलाकार कलेवर अवलंबून मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही अशाच कलाकारांना लाभ देण्यात येईल. केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतभुत नसलेले कलाकार लाभ घेऊ शकतील. कलाकार साहित्यीक हे महाराष्ट्राचे रहिवासी असणे बंधनकारक आहे.
अटी शर्तीची पुर्तता करणाऱ्या वृध्द साहित्यीक व कलावंतानी आपले परिपूर्ण प्रस्ताव आपले सरकार पोर्टलवर https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या संकेतस्थळावर सादर करावे. प्रस्तावासोबत पती पत्नी व पत्नीचा एकत्रित पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक खाते क्रमांक व बॅकेचा आयएफएससी कोड क्रमांक, जन्मतारखेचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, प्रतिज्ञापत्र, दिव्यांग असल्यास अपंग प्रमाणपत्र, नामांकित संस्था किंवा व्यक्ती यांचे प्रमाणपत्र सादर करावे, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले यांनी कळविले आहे.
