Latest Posts

स्वाधार योजनेच्या अर्जाची पुर्तता करुन ३१ मार्च पर्यंत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील जिल्हा तसेच तालुका स्तरावरील ज्या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेबर आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत व कार्यालय स्तरावरुन त्याची तपासणी करुन त्रुटी पुर्ततेकरीता जे अर्ज विद्यार्थ्यांच्या लॉगीनवर परत करण्यात आलेले आहेत त्यांनी त्रुटीची पुर्तता करुन ऑनलाईन अर्जाची योग्य त्या कागदपत्रासह हार्ड कॉपी ३१ मार्च पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात जमा करावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त किशोर भोयर यांनी केले आहे.

तसेच योजनेची रक्कम विद्यार्थ्याच्या बँक खात्या जमा होण्याच्या दृष्टीने संकेतस्थळावर बँक डिटेल्स भरणे बाबत टॅब नव्याने उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने प्रणालीवरअर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी तात्काळ माहिती भरावी असे समाज कल्याण विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss