विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे सन २०२४-२०२५ या वर्षात एकूण २६९ विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन प्रणालीतून स्विकारण्यात आले असून विद्यार्थ्यांचे अर्ज त्रृटीपूर्तता करण्यासाठी सेंडबँक करण्यात आले आहेत. परंतु hmas.mahait.org या ऑनलाइन प्रणालीवर त्रृटीपूर्तता करण्याची कार्यवाही १० जून २०२५ पासून बंद असल्याने सेंडबँक झालेले अर्ज ऑफलाइन पध्दतीने ११ जुलै रोजी विशेष शिबिरामध्ये स्विकारण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेस आवश्यक असलेल्या कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय वर्धा येथे सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.
