Latest Posts

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश आमंत्रित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (wardha) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत जिल्ह्यात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्धा प्रकल्पांतर्गत ७ मुलांचे व ५ मुलींचे असे एकुण १२ वसतीगृहे कार्यरत आहे. यात जिल्हास्तरावरील ४ तर तालुकास्तरावरील ८ वसतीगृहाचा समावेश आहे. या वसतीगृहामध्ये रिक्त असलेल्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

शैक्षणिक सत्र २०२५ – २०२६ साठी आदिवासी मुला मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशाकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल. वसतीगृहामध्ये प्रवेशासाठी  प्रीमॅट्रीक, कनिष्ठ महाविद्यालय ते पदवी, पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता http://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. अर्ज प्रवेशाबाबतची सुचना संकेतस्थळावर वेळोवेळी प्रदर्शित करण्यात येते.

प्रवेश प्रक्रिया गुणवत्ता तथा नियमानुसार करण्यात येईल. वसतीगृहात रिक्त जागेच्या अधिन राहुन प्रवेश देण्यात येणार आहे. १२ वी नंतर जिल्हास्तरावरील वसतीगृहाकरीता  ऑनलाईन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश न मिळाल्यास पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेत वळती करण्यात येणार आहे.

प्रवेश प्रक्रिये संबंधी अधिक माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात उपलब्ध आहे, तसेच संबंधीत वसतीगृहाचे गृहपाल यांचेशी संपर्क साधावा, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी दिपक हेडाऊ यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss