विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव दर्जा) ॲङ धर्मपाल मेश्राम २ एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन सकाळी ११ ते १२ वाजता जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्यासोबत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत आढावा बैठकीस उपस्थिती.
दुपारी १२ ते १ वाजता मुख्याधिकारी नगर परिषद वर्धा यांच्या सोबत आढावा विविध कामाची पाहणी, दुपारी १ ते २ मुख्याधिकारी नगर परिषद आर्वी यांचे सोबत आढावा व कामाची पाहणी. दुपारी २ ते २. ३० राखीव दुपारी २. ३० ते ३.३०वाजता मुख्याधिकारी नगर परिषद देवळी यांचे सोबत आढावा व कामाची पाहणी, दुपारी ३. ३० ते ४.३० वाजता मुख्याधिकारी नगर परिषद हिंगणघाट यांचे सोबत आढावा व कामाची पाहणी, दुपारी ४.३० ते सायंकाळी ५.३० वाजता मुख्याधिकारी नगर परिषद पुलगाव यांचे सोबत आढावा व कामाची पाहणी. सायंकाळी ५.३० ते ६.३० वाजता मुख्याधिकारी नगर परिषद सिंदी रेल्वे यांचे सोबत आढावा व कामाची पाहणी करतील. त्यानंतर सोइनुसार नागपूर कडे प्रयाण करतील.
