Latest Posts

साकोली भूमि अभिलेख कार्यालयाच्या संकेतस्थळ व QR कोडचे जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या हस्ते लोकार्पण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : नागरिकांना अधिक सुलभ सेवा देण्यासाठी साकोली भूमि अभिलेख कार्यालयाने जिल्हा सूचना केंद्र भंडारा यांच्या सहकार्याने नवीन QR कोड व संकेतस्थळ विकसित केले आहे. या उपक्रमाचे लोकार्पण जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या हस्ते ११ एप्रिल २०२५ रोजी, महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या निमित्ताने करण्यात आले.

या नव्या सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या कार्यालयाशी संबंधित तक्रारी नोंदवता येणार आहेत, तसेच प्रलंबित कामांबाबत माहिती मिळविणेही शक्य होणार आहे. QR कोडच्या माध्यमातून तक्रार दाखल करण्याची सुविधा आणि कार्यालयाच्या संकेतस्थळावर विविध योजना, कार्यपद्धती, शासन निर्णय, परिपत्रके व इतर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या प्रसंगी महसूल विभागाचे सर्व उप जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यालयाचे अधिकारी फुलझेले यांनी QR कोड व संकेतस्थळाच्या उपयोगिता विषद केली. उप अधीक्षक फुलझेले, NIC चे अधिकारी वासनिक व निवासी उप जिल्हाधिकारी बेलपात्रे यांचे जिल्हाधिकारी डॉ. कोलते यांनी विशेष अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी कार्यालय अधीक्षक रोहिणी पाठराबे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Latest Posts

Don't Miss