– स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोलीस स्टेशन राजुरा ची कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा हत्या करून अपघाताचा देखावा करणाऱ्या प्रियकर सह ३ जणांना अटक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व राजुरा पोलीसांनी अटक केले असून नंदकिशोर चरणदास सोयाम (२५) रा. सुमठणा, कार्तिक उर्फ गोलू टेकाम रा. सुमठाना व रॉयल कुळसंगे रा. सुमठणा असे आरोपीचे नाव आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
२४ एप्रिल चे रात्रौ १०:०० वा ते २५ एप्रिल, २०२५ चे सकाळी ०६:०० वाजता दरम्यान यातील मृतक नामे नितेश किसन निमकर (३३) वर्ष रा. सुमठाणा याचा अपघाती मृत्यु झाल्याची माहितीवरुन घटनास्थळी राजुरा पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे वेगवेगळे पथक, फॉरेन्सिक टिम पोहचुन प्रेताची उत्तरीय तपासणी व पंचनामा करुन अपघाताबाबत सखोल चौकशी व तांत्रीक दृष्टया बारकाईने तपास केला असता असे यातील मृतक नितेश निमकर याचे पत्नी सोबतचे अनैतिक प्रेमसंबंधावरुन आरोपी नंदकिशोर चरणदास सोयाम (२५) वर्ष रा. सुमठाणा याने त्याचे दोन सहकाऱ्याचे मदतीने मृतक यास घटनास्थळी बोलावुन त्याचेशी वादविवाद करुन संगनमताने मृतकाचे डोक्यावर लोखंडी रॉडने वार करुन जागीच ठार मारले व मृतकचे प्रेत त्याचे मोटार सायकलसह रस्त्याचे कडेला टाकुन अपघात झाल्याचा देखावा निर्माण केला.
यावरुन फिर्यादी किसन भगवान निमकर वय ५६ वर्ष रा. सुमठाणा यांचे रिपोर्टवरुन आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन राजुरा येथे अपराध क्रमांक २२१ / २०२५ कलम १०३ (१) भारतीय न्याय संहिता – २०२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी नंदकिशोर चरणदास सोयाम (२५) वर्ष रा. सुमठाणा यास काही तासातच अटक करण्यात आली असुन पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.
सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक दिपक कॉक्रेडवार, सहायक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा प्रकाश बल्की, किशोर वैरागडे, अजय बागेसर, पोअं प्रमोद कोटनाके, गोपीनाथ नरोटे, किशोर वाकाटे, शशांक बादामवार, चापोहवा प्रमोद डंबारे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि पोलीस ठाणे राजुरा चे प्रभारी अधिकारी अनिकेत हिरडे, परि. सहा. पोलीस अधीक्षक यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक रमेश नन्नावरे, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पवार, पोलीस उपनिरीक्षक पोउपनि सोरते, पोहवा अनुप डांगे, पोअं. योगेश पिदुरकर पोस्टे राजुरा आणि फॉरेन्सीक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक पायल शंभरकर व पथक यांनी अथक परिश्रम घेवुन मोलाची कामगिरी बजावली आहे.
