Latest Posts

पुणे – नागपूर – पुणे दरम्यान १४ अतिरिक्त साप्ताहिक उन्हाळी विशेष वातानुकुलीत गाड्यांचा संचालन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : उन्हाळी सुट्यांच्या काळात प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेकडून पुणे – नागपूर – पुणे दरम्यान १४ अतिरिक्त साप्ताहिक उन्हाळी विशेष वातानुकुलीत गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तपशील पुढीलप्रमाणे :

गाडी क्र. ०१४३९ / ०१४४० पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक सुपरफास्ट वातानुकुलीत विशेष (१४ फेऱ्या)

गाडी क्र. ०४९ साप्ताहिक सुपरफास्ट वातानुकुलीत विशेष गाडी १२.०४ . २०२५ ते २४.०५. २०२५ दर शनिवार रोजी पुणे येथून १९. ५५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी १४. ४५ वाजता नागपूरला पोहोचेल. (०७ फेऱ्या)

गाडी क्र. ०१४४० साप्ताहिक सुपरफास्ट वातानुकुलीत विशेष गाडी १३. ०४. २०२५  ते २५.०५. २०२५ दर रविवार रोजी नागपूर येथून १६.१५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी ०७. २० वाजता पुण्याला पोहोचेल. (०७ फेऱ्या)

थांबे : दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा.

डब्यांची संरचना : ८ वातानुकुलीत द्वितीय श्रेणी (AC २ -Tier), १० वातानुकुलीत तृतीय श्रेणी (AC ३ -Tier), २ गार्ड ब्रेक व्हॅन – एकूण २० डबे.

गाडी क्र. ०१४३९ आणि ०१४४० या विशेष गाड्यांसाठी आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष भाड्यांवर उपलब्ध होईल.

या विशेष गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक आणि थांब्यांसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा.

Latest Posts

Don't Miss