Latest Posts

प्रोजेक्ट मॅनेजर ला खंडणी ची मागणी : विक्रांत सहारे युवा सेना जिल्हा अध्यक्ष शिवसेना (उबाठा) विरुद्ध गुन्हा दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :  वेकोलि ओपन कास्ट भटाळी येथील कावेरी C5 JV कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजर यांना खंडणी मागणाऱ्या विरोधात रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. विक्रांत सहारे युवा सेना जिल्हा अध्यक्ष शिवसेना (उबाठा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. ३१ मार्च २०२५ रोजी फिर्यादी  व्यंकटेश्वर रामण्णा रेड्डी प्रोजेक्ट मॅनेजर, कावेरी C5 JV कंपनी, वेकोलि ओपन कास्ट भटाळी यांनी पोलीस स्टेशन रामनगर येथे रिपोर्ट दिले की, त्यांच्या कंपनीच्या एच आर यांनी एका अल्पवयीन बालकास कामावर ठेवले होते, सदर बाब त्यांचे लक्षात येताच, त्यांनी सदर मुलास कामावरून कमी केले, म्हणून सदर मुलाची आई आणि विक्रांत सहारे हे त्यांचे कंपनीत येऊन मुलाला मारहाण का केली असे खोटे आरोप करून कामगार आयुक्त चंद्रपूर यांच्याकडे तक्रार नोंदवली.

यावरून कंपनीचे मॅनेजर आणि एच आर हे विक्रांत सहारे यांचे कार्यालयात जाऊन सदर खोटी तक्रार का केली अशी विचारणा केली असता विक्रांत सहारे यांनी आता माझा इगो हर्ट झाला आहे मला ५ लाख रुपये द्या आणि माझ्या दहा लोकांना कामावर ठेवा अन्यथा मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन कंपनीची बदनामी करेल अशी धमकी दिली. अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशन रामनगर येथे कलम ३०८(२), ३५१(२) भारतीय न्याय संहिता अन्वये विक्रांत सहारे यांचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशन चे ठाणेदार आसिफराजा शेख करीत आहे.

Latest Posts

Don't Miss